महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
भोसले राजघराण्याच्या परंपरेनुसार सिनीयर भोंसला पॅलेस येथे नवमीला शस्त्र, अश्व व वाहन पूजन

नागपूर : ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध परंपरा जपणाऱ्या नागपूरच्या भोसले राजघराण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सिनीयर भोंसला पॅलेस येथे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच नवमीला पारंपरिक शस्त्र पूजन, अश्व पूजन व वाहन पूजन मोठ्या उत्साहात पार पडले.
या धार्मिक व ऐतिहासिक विधीचे आयोजन नागपूर महाराज राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पॅलेस परिसरात राजघराण्याचे सदस्य, मान्यवर व भाविक उपस्थित होते.
भोसले घराण्याच्या परंपरेनुसार दरवर्षी शस्त्र आणि अश्व पूजनाला विशेष महत्त्व असून, हा सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक परंपरेचे जतन करणारा आहे.



