महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
इंस्टाग्राम फ्रेंडने लग्नाचं आमिष दाखवत अल्पवयीनावर वारंवार बलात्कार : चार ते पाच तासात आरोपी अटक

नागपूर : इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आरोपीविरुद्ध पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव नितेश साहू (वय 24) असे असून, त्याने पीडितेस लग्नाचे आश्वासन देत दीर्घकाळ शारीरिक शोषण केले. मात्र, जेव्हा पीडितेने लग्नाबाबत विचारले तेव्हा आरोपीने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला तसेच मारहाण करून “तुला जे करायचं ते कर” अशा शब्दांत धमकावून पळ काढला.
या प्रकरणाची माहिती वपोनी संजय मंडे यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, मारहाण तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे.



