महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
सांड नदीच्या पुलावरून वाहून गेला ४५ वर्षीय इसम : शोध कार्य सुरू, मौदा परिसरातील घटना

मौदा : -तालुक्यातील मौजा तारसा गावाजवळ सांड नदीच्या पुलावर मोठा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडा गावातील रहिवासी जगदीश इनवते (वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे) हे आपल्या दुचाकीवरून (क्र. MH 31 AS 5305) निमखेडा येथून तारसा मार्गे नागपूरकडे जात होते.
दरम्यान, सांड नदीच्या पुलावरून ते जात असताना जोरदार प्रवाहामुळे दुचाकीसह ते नदीपात्रात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच मौदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सद्यस्थितीत मृतकाचे प्रेत पावेतो सापडलेले नसून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथक नदीपात्रात शोध घेत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



