महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
सराईत वाहनचोराला अटक : पाच दुचाकी व एक चार चाकीसह लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : मानकापूर पोलिसांनी चोरीच्या वाहनांच्या मालिकेत गुंतलेल्या सराईत वाहन चोराला गजाआड करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच दुचाकी व एक व्हागणार कार जप्त केली असून, वाहन चोरीच्या मालिकेतील गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवम देवदूत त्रिपाठी गोरेवडा ऐकता नगर अस आरोपीच नाव असून त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध मानकापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




