130 साखरेच्या पोत्यासह ट्रक चोरी: आरोपी अटक, महागडे शोक पूर्ण करण्यासाठी आरोपीने लंपास केला ट्रक

नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ट्रक चोरीच्या प्रकरणाचा उलगडा करत अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. गुप्त माहितीदार व तांत्रिक तपासणीच्या आधारे पोलिसांनी दाभा लावा परिसरातून ही धडाकेबाज कारवाई केली.
ऋषभ गोविंद निवनाते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने चोरी केलेल्या ट्रकमध्ये तब्बल 130 साखरेची पोती लंपास केली होती. पोलिसांनी ट्रकसह सर्व मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने महागळे शौक पूर्ण करण्यासाठी ही चोरी केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. सोन्याची चेन व इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे उघड झाले.
गिट्टीखदान पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता आणि कार्यक्षम तपासामुळे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवघ्या काही तासांत मोठा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला गजाआड केल्याने परिसरात पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.


